दापोली : शिक्षण संस्था संचलित ए. जी. हायस्कूलच्या ज्युनिअर कॉलेज विभागाच्या वतीने नुकतेच ‘प्रतिबिंब’ भित्तिपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेच्या संचालिका स्मिता सुर्वे यांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न झाले.
प्रतिबिंब २०२६-२७ या उपक्रमाचे महत्त्व विशद करताना स्मिता सुर्वे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असते.

तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने अशा विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन स्वतःचे व्यक्तिमत्व अधिक सक्षम बनवले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला मुख्याध्यापक शरद कांबळे, पर्यवेक्षक मगदूम एस. आय., ज्येष्ठ शिक्षिका मानसी अभ्यंकर, कला शिक्षक श्रीराम महाजन, मराठी विभागाच्या श्रेया भावे, राजेश पवार यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि अकरावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


