लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर निर्लज्ज हल्ला! चिपळूणमध्ये पत्रकाराला रक्ताळले; गुंडशाही की पतसंस्था?

चिपळूण: रत्नागिरी जिल्ह्याच्या शांततेला गुंडशाहीचे ग्रहण लागले असून, चिपळूणमध्ये पत्रकारितेला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना घडली आहे.

‘दूरदर्शन’चे प्रतिनिधी दीपक भागवत यांच्यावर एका पतसंस्थेच्या समर्थकांनी केवळ कर्तव्य बजावत असताना जीवघेणा हल्ला केला.

या हल्ल्यात भागवत गंभीर जखमी झाले असून, या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचा वणवा पेटला आहे.

नेमकं काय घडलं? (घटनाक्रम)
एका स्थानिक पतसंस्थेच्या कथित गैरव्यवहाराविरोधात उपोषण होणार होतं. ज्याचं वार्तांकन करण्यासाठी आणि सत्य जनतेसमोर मांडण्यासाठी दीपक भागवत तिथे पोहोचले. मात्र, सत्य उघड होण्याच्या भीतीने अस्वस्थ झालेल्या पतसंस्थेच्या गुंडांनी भागवत यांना लक्ष केले.

  • धक्काबुक्की आणि शिवीगाळ: सुरुवातीला कामात अडथळा आणून त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली.
  • बेदम मारहाण: वादाचे पर्यावसान अमानुष मारहाणीत झाले. भागवत यांच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर वार करण्यात आले.
  • दहशतीचे वातावरण: भररस्त्यात एका पत्रकाराला रक्ताळले जात असताना हल्लेखोरांमध्ये कायद्याची कोणतीही भीती दिसून आली नाही.
  • व्हिडिओ व्हायरल; गुंडांचा चेहरा उघडा!
    या अमानुष मारहाणीचे चित्रीकरण सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहे. व्हिडिओमध्ये पतसंस्थेचे गुंड एका नि:शस्त्र पत्रकारावर ज्या पद्धतीने तुटून पडले आहेत, ते पाहून चिपळूणकरांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. “दोषींना भरचौकात शिक्षा द्या” अशी मागणी आता सर्वसामान्यांतून होत आहे.
  • पत्रकार संघटना आक्रमक: “आता माघार नाही!”
    मराठी पत्रकार परिषद आणि जिल्हा पत्रकार संघाने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. राज्य उपाध्यक्ष हेमंत वणजु यांनी पोलीस प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत:

“हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नाही, तर लोकशाहीच्या आवाजावर आहे. जर पत्रकारांनाच संरक्षण नसेल, तर सामान्यांचे काय? पोलिसांनी तात्काळ गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*