
दापोली: भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी उत्तर जिल्हा चिटणीस संजय धोंडू सावंत यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
दापोली येथील रहिवासी असलेल्या सावंत यांनी आपले राजीनामा पत्र रत्नागिरी उत्तरच्या जिल्हाध्यक्षांकडे पाठवले असून, या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

सावंत यांनी राजीनामा पत्रात स्पष्ट केले आहे की, काही वैयक्तिक कारणे आणि भविष्यातील व्यावसायिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना पक्षकार्यासाठी पूर्ण वेळ देणे कठीण होत आहे.
त्यामुळे २५ मार्च २०२६ पासून त्यांनी आपल्या सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पक्षात कार्यरत असताना मिळालेल्या संधीबद्दल आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली असली, तरी त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक संघटनेत

Leave a Reply