गुहागर तालुक्यातील गिमवीत रानडुकराची अवैध शिकार; तिघांना अटक, ४०७ टेम्पो आणि बंदूक जप्त

गुहागर: तालुक्यातील गिमवी येथे २३ मार्च २०२६ रोजी रात्री १०:३० च्या सुमारास वनविभागाच्या पथकाने अवैध शिकारीवर मोठी कारवाई केली.

गिमवी गावच्या हद्दीत विना नंबर प्लेटचा ४०७ टेम्पो संशयास्पद रित्या उभा असल्याचे आढळले.

या वाहनाची झडती घेतली असता, त्यात एक मृत रानडुक्कर आणि शिकार करण्यासाठी वापरलेली १२ बोरची डबल बॅरल बंदूक मिळून आली.

या प्रकरणी प्रसाद सुभाष सोम, रोशन रमेश मोरे आणि संदीप वसंत गावडे (सर्व राहणार गिमवी) या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

ही कारवाई विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी सरवर खान, वनपाल अमित निमकर, एस. एस. सावंत, वनरक्षक सिद्धेश्वर गायकवाड, अरविंद मांडवकर, कुमार पवार, राहुल गुंठे आणि कृष्णा इरमले यांच्या पथकाने केली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*