डॉ. प्रफुल्ल अहिरे यांच्या संगीत दिग्दर्शनाखालील ‘श्री राम चरण का एक सुमन’ भजन प्रदर्शित

दापोली: रामनवमीच्या पावन निमित्ताने “श्री राम चरण का एक सुमन मैं बन सकूं” हे विशेष भजन श्रोत्यांच्या भेटीला आले आहे. वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रस्तुत या भजनाचे वैशिष्ट्य म्हणजे दापोली कोकण कृषी विद्यापीठातून निवृत्त झालेले डॉ. प्रफुल्ल अहिरे यांनी याचे संगीत दिग्दर्शन केले असून गझलसम्राट अनुप जलोटा यांच्यासोबत गायनही केले आहे.

या संपूर्ण प्रकल्पात डॉ. अहिरे यांची आध्यात्मिक ओढ आणि संगीतातील जाण प्रकर्षाने दिसून येत आहे.

अनुप जलोटा यांनी डॉ. प्रफुल्ल अहिरे यांच्या संगीताचे भरभरून कौतुक केले आहे.

डॉ. अहिरे यांची संगीतावरील पकड आणि भक्तीभाव व्यक्त करण्याची शैली अत्यंत प्रभावी असून त्यांच्यासोबत काम करताना एक वेगळी ऊर्जा मिळाल्याचे जलोटा यांनी नमूद केले. डॉ. अहिरे यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे या भजनाला एक विशेष उंची प्राप्त झाली आहे.

सविता पाटील यांनी या भजनाची शब्दरचना केली असून मिलिंद गोवेकर यांनी म्युझिक अरेंजर म्हणून साथ दिली आहे. व्हीएसएक्स आणि नवलाई स्टुडिओमध्ये या भजनाचे रेकॉर्डिंग पार पडले.

कोरसमध्ये विश्वास, मुकुंद, प्रिया आणि कश्मिरा यांचा आवाज असून विजय शिवलकर यांनी रिदम अरेंजरची भूमिका निभावली आहे. डॉ. प्रफुल्ल अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेली ही

कलाकृती भक्ती आणि संगीताचा एक अनोखा संगम ठरली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*