
दापोली: शहरातील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित ए.जी. हायस्कूलने राज्य शासनाच्या कला संचालनालयामार्फत आयोजित ड्रॉइंग ग्रेड परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत यश मिळवले आहे.
एलिमेंटरी स्तराच्या परीक्षेत एकूण १२९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून सर्व १२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामुळे विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. यातील गौरव शशिकांत खरे, समृद्धी ज्ञानदेव देवकाते, खुषी सुशील कोळंबे, श्रावणी सचिन मोहिते, स्वरा प्रसाद मोरे आणि यश राजेंद्र भटावळे या विद्यार्थ्यांनी A श्रेणी मिळवली आहे. तसेच २१ विद्यार्थ्यांनी B श्रेणी प्राप्त केली.
इंटरमिजिएट स्तरावर १४७ विद्यार्थ्यांपैकी १४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९६.६० टक्के इतका आहे. या स्तरावर अंतरा महेंद्र पुशीलकर, अनुष्का अनिल पवार, आर्या निलेश कराड, मनस्वी विजय जाधव, मृदुला संदीप क्षीरसागर, निकेत श्रीकांत सावंत, राज राजेंद्र मर्चंडे, श्रेया महेश पडवेकर, श्रीया संदीप दाभोळे, श्रीया शैलेश कोटीया, स्मिता सुग्रीव गुट्टे आणि विधि दिनेश मुलुख या विद्यार्थ्यांनी A श्रेणी मिळवली आहे. तर ३० विद्यार्थ्यांनी B श्रेणी प्राप्त केली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्रीराम महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. शालेय समितीचे चेअरमन रवींद्र कालेकर, संचालिका सौ. स्मिता सुर्वे, मुख्याध्यापक एस.एम. कांबळे, उपमुख्याध्यापक अर्जुन घुले, पर्यवेक्षक अनिल पेटकर, मगदूम एस.आय. आणि ज्येष्ठ शिक्षिका मानसी अभ्यंकर यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष कौतुक केले आहे.

Leave a Reply