
रत्नागिरी : विश्वशांतीचे अग्रदूत आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या पावन उपस्थितीत गुरुवार, दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर मैदानावर सायंकाळी ६ वाजता भक्ती उत्सव संपन्न होणार आहे.
या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक समृद्धी वाढवणाऱ्या भव्य सोहळ्याच्या ठिकाणी कामाला प्रारंभ करण्यासाठी गुरूपूजनाचा विधी पार पाडण्यात आला.

या गुरूपूजन सोहळ्यात आर्ट ऑफ लिव्हिंग रत्नागिरीच्या भक्ती उत्सव संयोजिका आणि आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर ॲड. जया सामंत यांच्यासह आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर्स सोनिया, विनिता गोखले, भुवना महागावकर, नितीशा मोरे, अनघा देशपांडे आणि निलेश मिरजकर उपस्थित होते.
कोकणच्या इतिहासात प्रथमच गुरुदेव श्री श्री रविशंकरजींचे रत्नागिरीत आगमन होत असून, हा कार्यक्रम अध्यात्म, भक्ती, ज्ञान आणि संगीताचा अनोखा मिलाफ साकारणारा ठरणार आहे. भक्ती उत्सवात सहभागी होण्यासाठी सर्व भाविक आणि नागरिकांना आमंत्रित करण्यात आले आहे.

Leave a Reply