रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात 73 कोरोना रूग्ण, दोघांचा मृत्यू

रत्नागिरीः-शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार केवळ 73 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात 24 तासात 30 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 74 हजार 489 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95.99 टक्के आहे. नव्याने 73 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 77 हजार 600 इतकी झाली आहे.

कोरोनाने नव्याने 2 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही मृत्यू यापूर्वीचे आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 410 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.11 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 428 तर संस्थात्मक विलीकरणात 273 रुग्ण उपचार घेत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*