दापोली आसूद अपघातात सात जणांचा मृत्यू

दापोली : तालुक्यातील आसूद जोशी आळी इथं झालेल्या अपघातात मृतांचा आकडा वाढला आहे. मॅक्झिमो गाडीच्या चालकासह 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

दापोलीतून आंजर्ले कडे प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो व दापोलीकडे येणारा ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत मँक्झिमो चालक अनिल (बॉबी) सारंग याच्यासह 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असून यात 2 लहान मुलांचा समावेश आहे.

आज रविवारी दिनांक 25 जून 2023 रोजी दुपारी 2 वाजण्याचे सुमारास अनिल (बॉबी) हे त्यांची मॅक्झिमो क्रमांक एम.एच.08.5208 हे दापोलीतून आंजर्लेकडे 14 प्रवासी घेऊन जात होते.

त्यांची गाडी आसूद जोशी आळी नजीक असलेल्या वळणावर आली असता समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने बाहेरून टर्न मारल्याने मॅक्झिमो ट्रकवर आदळली, ट्रॅकने मॅक्झिमोला रस्त्याच्या डाव्या बाजूला घासत नेले. हा अपघात एवढा भयानक होता की मॅक्झिमो मधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच दापोलीचे पोलिस निरीक्षक विवेक आहिरे यांनी पोलीस कर्मचारी व रुग्णवाहीका घेऊन अपघातस्थळी धाव घेतली.

या अपघातात अनिल सारंग चालक वय 45 रा. हर्णे, संदेश कदम 55, स्वरा संदेश कदम – 8, मारियम काझी – 6, फराह काझी – 27, सर्व रा. अडखळ तर मीरा महेश बोरकर, वय 22, रा. पाडले, वंदना चोगले वय 34 रा. पाजपंढरी यांचा मृत्यू झाला आहे.

तर सपना संदेश कदम वय 34, रा. अडखळ, श्रद्धा संदेश कदम, वय 14, सामिया इरफान शिरगावकर, रा. अडखळ, विनायक आशा चोगले, रा. पाजपंढरी, भूमी सावंत वय 17, मुग्धा सावंत वय 14, ज्योती चोगले वय 9 रा. पाजपंढरी यांच्यावर उपजिल्हा व काही जखमींना मुंबई येथे हलविण्यात आले आहे. या अपघातानंतर ट्रक चालक फरारी झाला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*