रत्नागिरी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. आज शुक्रवारी (दि. ४) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत ६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. तीन रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे, तर ८९ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️चिपळूण २०
▪️संगमेश्वर १
▪️दापोली ७
▪️रत्नागिरी १९
▪️लांजा ५
▪️राजापूर ४
▪️खेड ३
▪️गुहागर २
▪️मंडणगड २
एकूण ६३