कोळथरे येथे बंद घर फोडून 6 लाखांच्या दागिन्यांची चोरी

दापोली – दापोली तालुक्यातील कोळथरे ब्राह्मणवाडी येथे बंद घर फोडून 6 लाख 5 हजार रुपयांचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडलीआहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश रामचंद्र सोमण हे घराला कुलूप लावून नोव्हेंबरमध्ये बाहेरगावी गेले होते. 16 जानेवारी 2022 रोजी ते पुन्हा घरी असता दरवाजाचे कुलूप तोडून कपाटाच्या लॉकरमधील दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. यामध्ये 7 तोळ्याचे 1 लाख 5 रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र, 11.520 ग्रॅम वजनाची 32 हजार रुपयांची सोन्याची चेन, 97 हजार रुपयांची सोन्याची अंगठी, 2 तोळ्याचा 56 हजार रुपयांचा सोन्याचा नेकलेस, 3 तोळे सोन्याची 98 हजाराची चेन, दीड तोळ्याची 42 हजाराची सोन्याची अंगठी असा मिळून 6 लाख 5 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.याबाबतची तक्रार सोमण यांनी दाभोळ पोलीस स्थानकात दिल्यानंतर 21 जानेवारी रोजी अज्ञातावर भादवि कलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास दाभोळ पोलीस स्थानक प्रमुख पूजा हिरेमठ मॅडम करित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*