रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. आज मंगळवारी (दि. २९) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत यापूर्वीचे १२३ आणि आजचे ४३१ असे मिळून ५५४ कोरोनाबाधित आढळले आहेत. गेल्या चोवीस तासांत ३३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ३०५ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️रत्नागिरी ९०
▪️दापोली ४४
▪️चिपळूण १२७
▪️संगमेश्वर ३८
▪️मंडणगड १
▪️गुहागर ४१
▪️खेड ५४
▪️राजापूर २५
▪️लांजा ११
एकूण ४३१
यापूर्वीचे १२३
एकूण ५५४