रत्नागिरी जिल्ह्याला 50 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स

रत्नागिरी : पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांसाठी 100 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स प्राप्त झाले असून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात 50 ऑक्सिजन कॉन्सट्रेटरर्सचे रत्नागिरी जिह्यासाठी वाटप करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जि. प. उपाध्यक्ष उदय बने, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, शिवसेनेचे शहरप्रमुख बिपिन बंदरकर, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी व इतर उपस्थित होते. रत्नागिरी जिह्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या 50 वायल उपलब्ध करून दिल्या. त्या सर्व वायल जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आल्या

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*