जखमींचा सर्व खर्च शासन करणार, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती
रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आसूद जोशी आळी या ठिकाणी ट्रक आणि वडाप यांची समोरासमोर टक्कर झाली या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.
यामधील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली तर जखमीचा सर्व खर्च शासन करणार असल्याचं रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यावर तात्काळ त्यांनी दापोलीतील अपघाताची माहीती घेतली. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोबाईलच्या माध्यमातून फ़ोन करुन अपघाताची माहिती दिली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्याचे जाहीर करण्याचे मुख्यमंत्री यांनी त्यांना आदेश दिले. त्याप्रमाणे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी आज ती मदत जाहीर केली आहे.