अफगाणिस्तान- तजाकिस्तान सीमेवर ५.७ रिश्टर स्केलचा भूकंप, थेट दिल्लीपर्यंत जाणवले झटके!

आज सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास पाकिस्ताच्या उत्तर-पश्चिम भागामध्ये तब्बल ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाची तीव्रता इतकी होती की पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचं केंद्र इस्लामाबादपासून सुमारे १८० किलोमीटर अंतरावर अफगाणिस्तान-ताजिकिस्तानच्या सीमारेषेजवळ या भूकंपाचं केंद्र असल्याची देखील माहिती मिळत आहे.

भूकंपामुळे थेट पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये धक्के जाणवले. याशिवाय चंदीगड आणि दिल्ली एनसीआर परिसरामध्ये देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील काबूलपासून २५९ किलोमीटर उत्तर-पूर्व, ताजिकिस्तानमधील दशानबेपासून ३१७ किलोमीटर दक्षिणपूर्व आणि पाकिस्तानमधील इस्लामाबादपासून ३४६ किलोमीटर उत्तर – पश्चिम असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सेस्मोलॉजिनं दिली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*