रत्नागिरी जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात होत असून दररोज पाचशेच्यावर सरासरी कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यातील दहा टक्के लोकांना ऑक्सिजन लागत आहे. गेल्या वेळेपेक्षा रुग्ण वाढीचा हा दर दुप्पट झाला आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे.
यासाठी नागरिकांनी सरकारने घातलेले बंधने पाळावीत व शक्यतो घराबाहेर पडू नये व आपली काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाणही वाढत असून वयस्कर रुग्णांबरोबर तरुण रुग्णांचाही मृत्यू होत आहेत.
शासकीय रूग्णालयातील ऑक्सिजन प्लांटची चाचणी सुरू असून प्लॉंट मधील ऑक्सिजन तपासणीसाठी गुड़गावला पाठविण्यात येणार असून त्याचा अहवाल आल्यानंतर हा लॅन्ट सुरू होईल.
औद्योगिक कंपन्याकडील ऑक्सिजन घेण्यात आला असून १ हजार जम्बो सिलिंडर आणि ड्युरा सिलिंडर ताब्यात घेण्यात आले आहेत.
चिपळूणात घरडा केमिकल्स ७० ऑक्सिजन बेड सुरू करत असून दापोलीतील कृषीभवन येथे ३० ऑक्सिजन बेड सुरू करण्यात येणार आहेत.
जिल्हा शासकीय रूग्णालयात ६० ऑक्सिजन बेडचे काम सुरू करण्यात आले आहे. महिला रूग्णालययेथेही ऑक्सिजन बेड वाढवण्यात येत आहेत. दापोली, कळंबणी आणि कामथे येथे ऑक्सिजन प्लॉंट उभारणार आहेत.
राजापूर येथे होणाऱ्या कोविड हॉस्पिटल मधील ऑक्सिजन प्लॉंट फिनोलेक्सकंपनीच्या मदतीने उभारणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.