रत्नागिरी – जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटतीच असली तरी मृत्यूसंख्या मात्र चिंतेचा विषय ठरली आहे. सोमवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात केवळ 30 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर 5 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात 24 तासात 70 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 75 हजार 158 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून 96.11 टक्के आहे. नव्याने 30 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 78 हजार 200 इतकी झाली आहे.

कोरोनाने 24 तासात 3 तर यापूर्वी 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 5 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 433 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.11 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 316 तर संस्थात्मक विलीकरणात 39 रुग्ण उपचार घेत आहेत.

https://mykokan.in