खेड लोटे एमआयडीसीत ‘समर्थ केमिकल्सच्या’ स्फोटात ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे.असे प्राथमिक माहितीत कळत आहे तर सहा कामगार जखमी झाले आहेत त्यापैकी तर तीन कामगारांना सांगली येथे हलवण्यात आले आहे,तर अन्य तीन कामगारांना परशुराम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून उपचार सुरू आहेत त्यामुळे पुन्हा एकदा लोटे परिसरातील औद्योगिक सुरक्षिततेबाबत व त्याबाबत करण्यात येणार्या सरकारी खात्याच्या तपासणीबाबत संशय निर्माण झाला आहे काही दिवसांपूर्वी घर्डा केमिकल्सच्या झालेल्या स्फोटात काही कामगारांचा बळी गेला होता त्यानंतर आता हा प्रकार घडला आहे औद्योगिक व कामगारांच्या सुरक्षिततेबाबत लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देत आहेत परंतु घटना घडल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कामगारांचे जीवन धोक्यात आले आहे.