चिपळूण : खेड तालुक्यातील आंबडस-सोलकरवाडी येथील रहिवासी व चिपळूण नागरी पतसंस्थेचा कर्मचारी अमित अर्जुन मोरे (२६) हा काही दिवसापासून बेपत्ता झाला आहे.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याची खबर अमित याचे वडील अर्जुन काशिराम मोरे (५८) यांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, १९ जानेवारी ११.१५च्या सुमारास चिपळूण नागरी पतसंस्थेच्या शहरातील भाजी मंडई येथील शाखेतून अमितने त्याचा सहकारी प्रशांत भैरवकरला डिपॉझिटचे भाऊकडून पैसे घेऊन येतो, असे सांगून निघून गेला.
त्यानंतर तो बराच वेळ झाला तरी परत आला नाही. त्याचा शोध घेतला असता तो कोठेही सापड़ला नाही. अखेर तो बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अमितचा रंग सावळा तर बांधा-सडपातळ आहे.
त्याचे केस काळे बारीक तसेंच उंची ५ फुट १ इंच, त्याने निळ्या रंगाचे शर्ट, फिक्कट निळसर रंगाची जिन्स पॅन्ट परिधान केली आहे.
शिवाय पायात तांबूस रंगाचे बुट व गळ्यात रुद्राक्ष माळ, उजव्या हाताला जखमेची खूण आहे. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास याची माहिती चिपळूण पोलीस ठाण्यात द्यावी.