दापोली तालुक्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 2510 नागरिकांचे स्थलांतर

दापोली :- दहा ते बारा जून दरम्यान कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर , जिल्हा व तालुका प्रशासनाने खबरदारीच्या सर्व उपाय योजनांची पूर्ता केली आहे अशी माहिती रत्नागिरीच्या जिल्हाधिका-यांनी दिली आहे. याचाच एक भाग म्हणून दापोली तालुक्यातील पाणी भरण्याची शक्यता असणारी गावे 15 गावातील 280 कुटूंब व 1329 नागरिक आणि 08 दरड प्रवण ठिकाणांहून -313 कुटुंब व 1181 नागरिक अशा एकूण 593 कुटुंबातील 2510 नागरिंकाचे आज रात्री पर्यंत स्थलांतर करण्यात येणार असून त्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*