रत्नागिरी जिल्ह्यातील सदुसष्ठ प्राथमिक आरोग्य केंद्रातील सध्या कार्यरत असलेल्या रुग्णवाहिकांची दुरावस्था झाली आहे अनेक रुग्णवाहिका कालावधी पंधरा वर्षांपेक्षा जास्त झाला आहे यामुळे कार्डियाक सह एकवीस नवीन रुग्णवाहिका खरेदीसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष व आरोग्य सभापती उदय बने यांनी दिली आहे या रुग्णवाहिका पुढील आठवड्यात जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे.