गॅस सिलिंडर महागला ! जाणून घ्या नवीन दर

देशातील महागाई दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. भाज्यापासून तेलापर्यंत सर्वच वस्तूंच्या किंमती दिवसागणिक वाढत आहे. अशात पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आजपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत आता प्रति सिलेंडर 999.50 रुपये असेल. आजपासून एलपीजी सिलेंडरची वाढलेली नवी किंमत संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत असतानाच एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत.

‘आय एम सॅारी’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच

दापोली : आजच्या युगात काही इंग्रजी शब्द आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनले आहेत. बऱ्याचदा अनाहुतपणे हे शब्द आपल्या दैनंदिन जीवनात वापरले जातात. ‘सॅारी’ हा असाच […]