नवी दिल्ल्ली : कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकारने आपल्या विभागांमधील आणि मंत्रालयांमधील खर्चावर आळा घालण्याचे आदेश दिले आहेत. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांवरही कोरोनाच्या साथीचा परिणाम होणार आहे. ओव्हरटाइम (जास्त वेळ कामाचा ) भत्ता आणि बक्षीसांसारख्या खर्चामध्ये २० टक्के कपात करण्यात येणार आहे. जाहिराती, प्रसिद्धी, जादा कामाचा भत्ता, बक्षिसे, घरगुती व परदेशी प्रवास खर्च, किरकोळ देखभाल कामे यासारख्या बाबींवर केंद्रीय वित्त मंत्रालयाने सर्व सरकारी मंत्रालये आणि विभागांना २० टक्के खर्च कपात करण्याचे लक्ष्य दिले आहे.