राज्यातील १० मंत्र्यांसह २० आमदार कोरोनाबाधित

मुंबई: कोरोनाचे आकडे पुन्हा वाढत आहेत. याला राज्यातील नेतेमंडळी हातभार लावत आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय. कारण बड्या विवाहसोहळ्यांना उपस्थिती दर्शवलेल्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेली माहिती अजूनच धक्कादायक आहे. अजित पवार यांनी म्हटलं आहे की, चार दिवसांच्या अधिवेशनात राज्यातील १० मंत्री, २० आमदार कोरोना बाधित झाले आहेत. 
या नेत्यांना कोरोनाची लागण
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
आदिवासी मंत्री के. सी. पाडवी 
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
खासदार सुप्रिया सुळे
आमदार सागर मेघे
आमदार राधाकृष्ण विखे पाटील
आमदार शेखर निकम
आमदार इंद्रनील नाईक
आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)
आमदार माधुरी मिसाळ
माजी मंत्री दिपक सावंत
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*