दापोली : पाळंदे गावातील समुद्रकिनारी बुधवारी सापडलेल्या 2 कासवांना ग्रामस्थांनी मिळून जीवनदान दिलं आहे.
यामधील एक कासव जखमी होता. त्या कासवला ग्रामस्थांनी उपचारासाठी वनविभागाच्या ताब्यात दिलं आहे. कासवाला गावातील तरुणांनी जीवनदान दिलं आहे. तर दुसऱ्या कासवाला सुखरूप समुद्रात सोडून प्राण त्याचंही प्राण वाचवण्याचं काम त्यांनी केलं आहे.
पाळंदे समुद किनारी आलेल्या उधाणामुळे 2 कासव जिवंत अवस्थेत सापडले होते. या कासवांना आशिष आरेकर, संकेत तावसाळकर, प्रितम तवसाळकर, प्रसाद आरेकर, संजीत केळसकर, नानु मोरे, सर्पमित्र प्रितम साठविलकर यांनी वाचवण्याचं काम केलं. या सर्व ग्रामस्थांचं कौतुक होत आहे.
– माय कोकण