दापोलीत 1 लाख 40 हजाराचा गुटखा व दोन बंदुका जप्त

दापोली (Harnai) : स्थानिक गुन्हे अन्वेषण (LCB) शाखेच्या पथकाने शुक्रवारी हर्णे बाजारपेठ दापोली येथे छापा टाकून 1 लाख 40 हजार 341 रुपयांचा गुटखा (gutkha) आणि शनिवारी खेर्डी पानवाडी येथील एकाकडून 50 हजार रुपयांच्या दोन सिंगल बॅरल बंदूका जप्त केल्या आहेत. (Two single barrel gun)

प्रतिबंधित गुटख्या प्रकरणी या पथकाने अरमान आरिफ अकबाणी (26, रा. हर्णे बाजारपेठ, दापोली) याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 15 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तसेच बंदूकांप्रकरणी विनेश विश्राम बर्जे (40, रा. खेर्डी पानवाडी, दापोली) याला अटक केली. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास दापोली पोलीस करत आहेत.

ही कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप वांगणेकर, पोलीस हवालदार मिलिंद कदम, बाळू पालकर, विजय आंबेकर आणि चालक पोलीस नाईक दत्ताराम कांबळे यांनी सहभाग घेतला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*