दोन दिवसात मागण्या मान्य नाही तर उपोषण करणारच – बंटी वणजू

रत्नागिरी : निर्भीड व्यापारी महासंघ आणि देवरुख व्यापारी महासंघाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन लॉकडाऊन शिथिल करावा ही मागणी केली. प्रशासनानेही त्याला सकारात्मक प्रतिसाद देतानाच सर्व प्रकारच्या व्यापारी वर्गाला घरपोच डिलेव्हरी करता येईल असं स्पष्ट केले, अशी माहिती बंटी वणजू यांनी दिली.

आम्ही मंत्री महोदय आणि आमदार खासदार महोदयांकडे मागणी केली आहेच. पण आपणही आमच्या मागण्या सरकारकडे पोहोचवा आणि हा जाचक लॉकडाऊन येत्या दोन दिवसात मागे घ्या अन्यथा व्यापारी वर्गाच्या वतीने मी आमरण उपोषण करणारच हे बंटी वणजू यांनी सांगितलं.

यावेळी व्यापारी वर्गाच्या वतीने बंटी वणजू, भैया मलुष्टे, देवरुख व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबाशेठ सावंत, उपाध्यक्ष उल्हासशेठ नलावडे, अभिजीत शेट्ये, संजीव पटेल, मंदार गानू, सुनील मलुष्टे, दादा वाडेकर, सुदेश मलुष्टे, अस्लम मेमन, हॉटेल असोसिएशनचे निलेश भोसले, राजू भाटलेकर यांनी प्रशासनाची प्रतिनिधीक भेट घेतली.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे कुमार शेट्ये, तालुकाध्यक्ष बबलू कोतवडेकर, व्यापारी प्रतिनिधी मुकुल मलुष्टे, अजय गांधी, इद्रिस विंधांनी, अकील मेमन, मिलिंद माळवदे, अस्लम भुसारी, कादर मोटलांनी, असिफ मालानी, इसाक मेमन, साजिद मेमन, शिवा टेलर, बशीर भाई, पप्पु तोडणकर, रोहित मयेकर, रुपेश आडीवरेकर, अक्षय माजगावकर, यशवंत डोर्लेकर, जाकादेवीचे व्यापारी संकेत देसाई, सुमित देसाई आदी उपस्थित होते

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*