वंदे मातरम् के 150 वर्ष: व्ही. के. जोशी करजगाव हायस्कूल में सामूहिक गायन कार्यक्रम

करजगाव (प्रतिनिधी) – व्ही. के. जोशी करजगाव हायस्कूलमध्ये ‘वंदे मातरम्’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सामूहिक गायनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक एस. आर. जोशी, सांस्कृतिक विभागप्रमुख बारस्कर एम. जे., सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात कोकणे एस. आर. यांच्या ‘वंदे मातरम्’च्या इतिहासावरील मार्गदर्शनाने झाली. त्यानंतर बारस्कर यांनी गीताचे राष्ट्रीय महत्त्व विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केले. शेवटी मुख्याध्यापक जोशी यांनी ‘वंदे मातरम्’ या दोन शब्दांमधील प्रचंड सामर्थ्य आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्याच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. नव्या पिढीत राष्ट्रभक्ती व देशसमर्पणाची भावना जागृत करण्यासाठी असे उपक्रम किती महत्त्वाचे आहेत, यावर त्यांनी भर दिला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*