जिल्ह्यातील 150 महिला बनणार टुरिस्ट गाईड; जि. प. अध्यक्ष रोहन बनेंचा उपक्रम

रत्नागिरी : पर्यटन व्यावसायातून महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘रत्नतरुणी’ योजना राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी घेतला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील बचत गटात कार्यरत असलेल्या 150 महिलांना चारचाकी गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्याच महिलांना आपापल्या तालुक्यातील पर्यटन स्थळे, खाद्य संस्कृती याची माहिती दिली जाणार आहे. त्या महिलांना परिपूर्ण गाईड म्हणून पुढे आणले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये टुरिस्ट गाईड प्रशिक्षणाला आवश्यक निधीची तरतुद करण्याला हिरवा कंदिल मिळाला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*