राज्यात दिवसभरात १४ हजार ३७२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद ; एकही ओमिक्रॉनबाधिताची नोंद नाही

राज्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत काही दिवसांपासून घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज राज्यात गेल्या २४ तासात काल सोमवारच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात राज्यभरात १४ हजार ३७२ नव्या कोरोनाबाधितांची नोद करण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्येत घट झाली असली तरी, आज मृत्यूदरात वाढ झाली आहे. आज राज्यात एकूण ९४ कोरोनाबधितांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.

आज ३०,०९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ७३ लाख ९७ हजार ३५२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६३% इतका आहे.आज राज्यात १४ हजार ३७२ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. राज्यातील मृत्यूदर १.८४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ४७ लाख ८२ हजार ३९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७७ कोटी ३५ हजार ४८१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात १० लाख ६९ हजार ५९६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २ हजार ७३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात एकही ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही.आजपर्यंत राज्यात एकूण ३२२१ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. राज्यात आज रोजी एकूण १ लाख ९१ हजार ५२४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७७ लाख ३५ हजार ४८१ झाली आहे. काल राज्यात ९१ जण ओमिक्रॉनबाधित आढळले होते मात्र, आज एकही ओमिक्रॉनबाधिक रुग्ण सापडलेला नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*