नागपूर– राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने नागपूर जिल्ह्यासाठी एकूण 11 व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोरोना साथीच्या काळामध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्सची उपलब्धता असावी. साधन सामुग्रीअभावी कोणत्याही रुग्णांचा मृत्यू होऊ नये, यासाठी सामाजिक बांधिलकी जपत जिल्ह्यासाठी 11 व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
आज या व्हेंटिलेटर्सचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन सभागृहात पार पडले. जिल्हा शल्य चिकित्सकांकडे हे व्हेंटिलेटर्स सुपूर्द करण्यात आले.