मुंबई: राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC Exam) परीक्षांसदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार आहेत, असं त्या म्हणाल्या. आम्ही राज्य सरकारच्या वतीनं आणि शिक्षण विभागाच्यावतीनं कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. 

दहावी बारावी परीक्षांसदर्भात कुणी तरी माध्यमातून खोटी बातमी पेरली होती. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ज्या तारखेला आहेत त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही कोरोनाची परिस्थिती माॅनिटर करत आहोत, असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं. जे विद्यार्थी कोरोना काळात परीक्षेला बसू शकणार नाही त्यांच्यासाठी सप्लिमेंट्री परीक्षा घेण्यात येणार आहे.ठरलेल्या परीक्षांच्या कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असंही त्यांनी म्हटलंय. दहावी बारावीच्या परीक्षा कधी होणार हे सरकारनं स्पष्ट करावं, अशी मागणी मुख्याध्यपकांनी केली होती.