औरंगाबाद : कोरोनाच्या महामारीच्या काळात दवाखान्यातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. राज्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत मेगा भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वित्त विभागाची परवानगी घेतल्यानंतर 10 हजार पदे तातडीने भरण्यात येतील, अशी माहीती ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.