मुंबई 17 मार्च – होळी सणानिमित्त कोकणात एसटीच्या 100 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली. दरम्यान, होळीसाठी जाणाऱ्यांकडून खासगी गाड्यांनी जास्तीचे पैसे घेतले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिला आहे. त्याचवेळी प्रवाशांकडून ज्यादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसेसवर कारवाई करणार, असे त्यांनी यावेळी सांगितले.


16 ते 27 मार्च 2022 दरम्यान या गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत. तसेच एसटी संपाचा गैर फायदा घेवून खासगी बसेसनी प्रवाशांकडून ज्यादा भाडे आकारु नये, याबाबत प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ज्यादा भाडे घेऊन प्रवाशांची लुटमार करणाऱ्यांवर परिवहन आयुक्त यांनी दोषींवर कारवाई करावी, असे आदेश दिल्याचे अनिल परब यांनी सांगितले.