रत्नागिरी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या मान्यतेने व युवक प्रदेश अध्यक्ष मेहेबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदार संघाच्या निरीक्षक पदी रत्नागिरी जिल्ह्यातील डॅशिंग आणि आक्रमक युवा नेते आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्री बंटी सदानंद वणजू यांची नेमणूक करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेससंघटना या विधानसभा मतदार संघात बळकट करण्यासाठी ही निवड झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.