- शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेना अध्यक्षपदी शिवसेना उपनेते खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय कामगार सेनेच्या पुनर्रचित कार्यकारिणीची घोषणा लवकरच करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आलीआहे.