दापोली : दापोली नगरपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 3, 4 व 5 मधील मतदार यादीवर आक्षेप घेण्यात आला आहे. युवासेनेचे माजी तालुका युवा अधिकारी ऋषिकेश गुजर यांनी तहसीलदार वैशाली पाटील यांना या संदर्भात तक्रार अर्ज दिला आहे.
ऋषिकेश गुजर यांच्या या दाव्यानं शहरात खळबळ माजली आहे. हा प्रकरा सर्वच ठिकाणी सुरू आहे का? असा प्रश्नही या निमित्तानं निर्माण होत आहे.
दरम्यान, ऋषिकेश गुजर यांनी मतदार यादीतील खोटी नावं त्वरीत काढून टाकण्याची मगणी तहसीलदारांकडे केली आहे. ग्रामीण भागात मतदार असलेल्यांना खोटे पुरावे दाखवून नगरपंचायत मतदार यादीत सामाविष्ट करण्यात आलं आहे, अशी तक्रारही त्यांनी केली आहे.
यावेळी ऋषिकेश गुजर यांच्या सोबत माजी सभापती किशोर देसाई, मनसे जिल्हा उपाध्यक्ष सचिन गायकवाड, नगरसेवक खालीद रखांगे, नगरसेवक रवींद्र शिरसागर उपस्थित होते.