रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नजीकच्या गत कालावधीत सराईत गुन्हेगारी आणि अवैध धंद्याविरुध्द मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मादक द्रव्याच्या व्यवसायात गुंतलेल्या गुन्हेगारांविरुध्दची कारवाई, अवैध दारु, जुगार, पिटा कायद्यान्वये कारवाई, गुटखा विरोधी कारवाई, वन्य जीव संरक्षणासाठी कारवाई अशा विविध स्वरुपाच्या गुन्हेगारांविरुध्द कारवाई केलेली आहे. अनेक गुन्हेगारांना हद्दपारही केले आहे.
या पार्श्वभुमीवर मा. पोलीस अधिक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी सराईत गुन्हेगारांविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीं प्रदर्शन करणा-या व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस), वाळू तस्कर व जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणा-या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम १९८१ (एम.पी.डी.ए. कायदा) अन्वये कारवाईसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते.
या पार्श्वभुमीवर तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री अनिल लाड यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार शाहीद सादिक मुजावर, वय २७ वर्षे, रा. घ.नं. २०५४, बेलबाग, धनजीनाका, रत्नागिरी यांस एम.पी.डी.ए. कायद्यान्वये मा. जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे स्थानबध्द करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावाची श्री सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तसेच विविध स्तरावर आणि श्री दत्ता भडकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी छाननी केली. छाननी अंती दि.१८/०८/२०२१ रोजी मा. जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी डॉ. बी. एन. पाटील यांनी सदर कारवाईस महत्व देऊन प्रधान्याने सराईत गुन्हेगार शाहीद सादिक मुजावर यास स्थानबध्द करण्याचे आदेश दिले.
सदरचे आदेश प्राप्त होताच, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री विनीत चौधरी यांनी त्यास शोधण्यासाठी विविध पथके तयार केली आणि त्याचा शोध घेतला. शोधाअंती दि.१९/०८/२०२१ रोजी रात्री तो मिळुन आल्याने, त्यास स्थानबध्द आदेश बजावून त्यास रत्नागिरी विशेष कारागृह, रत्नागिरी येथे स्थानबध्दतेत ठेवण्यात आले आहे.
शाहीद सादिक मुजावर याच्या विरुध्द रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे चारी, जबरी चोरी, दुखापत करणे, शिवीगाळ करणे या सारखे गुन्हे दाखल आहेत. सन २०१४ मध्ये त्यास रत्नागिरी जिल्ह्यातुन ६ महिने कालावधीकरीता हद्दपार केले होते. त्याच्या विरुध्द चॅप्टर केसही करण्यात आली होती. तरीही त्याच्या गुन्हेगारी कारवाया त्याने थांबविल्या नाही आणि कायद्यास न जुमानता, त्याने त्याची गुन्हेगारी कृत्यु सुरुच ठेवली. त्याच्या गुन्हेगारीस बळी पडलेले सर्व सामान्य लोक त्यास घाबरून पोलीस ठाण्यास तक्रारही देत नव्हते. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे रत्नागिरी शहरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहचली होती. याबाबतची खात्री पोलीस उप अधिक्षक श्री राजेश कानडे, आर्थिक गुन्हे शाखा यांनी केली.
या पार्श्वभुमीवर मा. पोलीस अधिक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग यांच्या मागदर्शनाखाली सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरुन मा. डॉ. बी. एन. पाटील यांनी सराईत गुन्हेगार शाहीद सादिक मुजावर यास स्थानबध्द करण्याचे आदेश दिले.
रत्नागिरी जिल्ह्यातील सदरची कारवाई दुसरी असुन या पूर्वी सन २०१४-२०१५ मध्ये पोनि श्री विनीत चौधरी यांनी ते गुहागर पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना एका तभट्टी दारु व्यावसायीकाविरुध्द अशा कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला होता आणि त्या हातभट्टी दारु व्यावसायीकास या कायद्यान्वये स्थानबध्द करण्यात आले होते.
मा. पोलीस अधिक्षक डॉ. मोहीत कुमार गर्ग यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली तसेच मा. श्रीमती जयश्री देसाई, अपर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाईत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे सपोनि, मनोज भोसले, पो. उनिरी. संदीप वांगणेकर, पोह. दिपक जाधव, पोह, जयवंत बगड, पो.ना. प्रविण बर्गे, पोना. राहुल घोरपडे, पोना, नंदकिशोर सावंत, पोना. गणेश सावंत, पोना. मंदार मोहीते, पोना. अर्चना कांबळे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंतकुमार शहा, पोलीस उपनिरीक्षक श्री विकास चव्हाण, पोह. मिलींद कदम, पोह. विलास दिडपसे, पोह. संजय कांबळे, पोह. विजय आंबेकर, पोना. अमोल भोसले, पोना. सत्यजीत दरेकर, पोह. अपूर्वा बापट, पोह, वैष्णवी यादव यांनी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील उपचिटणीस श्री सुरेंद्र भोजे, प्रशांत होतेकर यांनी सहभाग घेतला. आगामी कालावधीतही सराईत गुन्हेगारांविरुध्द ठोस कारवाई करण्याची मोहीम या पुढेही सुरुच ठेवणार असल्याचे पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.