रत्नागिरी जिल्हा परिषदतर्फे प्रतिवर्षी दिले जाणारे आदर्श शाळा पुरस्कार बुधवारी जाहीर करण्यात आले. एकूण २१ शाळांचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर केंद्रप्रमुखही पुरस्कार जाहीर करण्यात आले. सन २०२१ साठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून प्राथमिक स्तरावर पिंपळोली मराठी (मंडणगड), आसूद नं. २ (दापोली), गुणदे तांबड (खेड), खांदाट भोई (चिपळूण), शिवनेरी नं. २ (गुहागर), लोवले नं. १ (संगमेश्वर), चांदेराई नं. १ (रत्नागिरी), हर्चे नं. 3 (लांजा), कोदवली नं. १ (राजापूर) तर विशेष म्हणून कुटगिरी नं. ३ (गुहागर) व खालगाव नं. २ (रत्नागिरी) या शाळांची निवड करण्यात आली. वरिष्ठ प्राथमिक स्तरावर कुंबळे (मंडणगड), आसुद नं. १ (दापोली), असगणी नं. २ (खेड), गोंधळे नं. १ (चिपळूण), साखरी बुद्रुक (गुहागर), साखरपा नं. १ (संगमेश्वर), आगवे तर्फे फुणगूस (रत्नागिरी), आंजणारी (लांजा), पेंडखळे नं. २ (राजापूर) तर आस्तान नं. १ (खेड) यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. केंद्रप्रमुखासाठी प्रवीण काटकर (दापोली) व मोहन कनवजे (साखरपा) यांची निवड करण्यात आली. हे पुरस्कार सभापती सुनील मोरे यांनी जाहीर केले. या वेळी शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, उपशिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे, नंदकुमार यादव, रवींद्र कुंभार, मनोज पाटील आदी उपस्थित होते.